🕒 1 min read
मुंबई : एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत दिसत आहेत. यामुळे भाजप शिवसेनेवर टीका करत आहे. या टीकेवर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनीही काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील हे टायगर मेमनच्या नातेवाईकासोबत दिसत आहेत. पेडणेकर यांनी आणखी काही फोटो शेअर केले आहेत ज्यात टायगर मेमनसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील दिसत आहेत.
टायगर मेमन हा मुंबई बॉम्बस्फोटातील फरार आरोपी असून तो पाकिस्तानातील कराची येथे दाऊद इब्राहिमसोबत बसला आहे. तो याकुब मेमनचा भाऊ आहे, ज्याच्या समाधीवरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण तापले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे pic.twitter.com/OO2ldr2iYd
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी किशोरी पेडणेकर यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या नातेवाईकासोबत किशोरी पेडणेकर काय करत असा प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी फडणवीस, कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांचे टायगर मेमनच्या नातेवाईकासोबतचे फोटो शेअर केले. यावर पलटवार करत त्या म्हणाल्या की, भाजपने आधी काय केले याचे उत्तर द्यावे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमच्या साथीदाराच्या नातेवाईकासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपाल कोश्यारी काय करत आहेत?.
कोणाची भेट कुठे झाली हे फोटो सांगत आहेत
जय श्रीराम
भारत माता की जय
वंदे मातरम
जय महाराष्ट्र pic.twitter.com/JOkRJtJdOb— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022
व्हायरल व्हिडीओवर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण –
किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी मुंबईची महापौर असताना काही भागात पाणी तुंबले होते, वीजपुरवठा खंडित झाला होता. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मी मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे, मशिदीत गेलो. या दरम्यान आम्ही अनेक बैठकाही घेतल्या. त्यावेळी शिवसेनेत असलेले यशवंत जाधवही आमच्यासोबत होते. त्या बैठकीला बीएमसीचे अधिकारीही उपस्थित होते. असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून भाजप काय सांगू पाहत आहे?”
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | “मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही” ; भाजपच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार
- Aurangabad Police | औरंगाबाद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! ‘असा’ घेतला बिंधास्त काव्याचा शोध
- Rupali Patil | “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील थोडक्यात जिंकले, यावेळी…” ; रुपाली पाटलांचा इशारा
- Britian New King | चार्ल्स-तृतीयची ब्रिटनचा नवा राजा म्हणून घोषणा तर पत्नीला क्वीन कॉन्सोर्ट ही पदवी
- Shivsena | मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर वरुण सरदेसाईंनी साधला निशाणा म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
