🕒 1 min read
मुंबई: काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही,असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. २०२४ साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे,अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत. ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा! असा सल्ला शिवसनेने सामना (Samana)अग्रलेखातून कॉंग्रेसला दिला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी(Mamata Banrjee) ह्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या विषयांवरून चर्चांना उधाण आले आहे. यावरच सामनातून म्हटले आहे की, ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे.
देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याचप्रमाणे ‘यूपीए’चे तुम्ही काय करणार? हे एकदा तरी श्रीमती सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगायला हवे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे हाच सध्या कळीचा मुद्दा असल्याचे सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- गुलाम नबी आझाद यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला…’
- भारतात ओमायक्रॉन आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही- डॉ. समीरन पांडा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
