Share

‘विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे…’, आशिष शेलारांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(३ डिसें.) भायखळय़ातील राणी बागेत झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत मोठा गोंधळ झाला. वरळीतील आग दुर्घटनेतील लहान बाळाचा नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी चर्चा सुरू असताना शिवसेना व भाजपच्या नगरसेवक आमने-सामने आले. याच पार्श्वभूमीवर आज(४ डिसें.)पत्रकार परिषद घेत भाजपा नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी शेलार यांनी विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे बंगाली हिंसेचे धडे तुम्ही घेताय का? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी बोलत असतांना शेलार म्हणाले की,’हा सगळा प्रकार एवढं डोकं फिरवणार आहे, दुर्घटना घडल्यानंतर जेव्हा रूग्णांना नायरमध्ये नेण्यात आले. तिथे ४५ मिनिटांमध्ये जास्त वेळ ना डॉक्टर, ना नर्स, देखरेख, औषधोपचार ना काळजी आणि दुर्लक्ष एवढं की चार महिन्यांचं बाळ देखील दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलं. या सगळ्याबाबत जे जनतेच्याच मनात आहे, नागरिकांच्याच मनात आहे की काय सुरू आहे? काय प्रकार आहे हा? दुर्घटनेनंतर जर रूग्ण महापालिकेच्या रुग्णालयात जातो तर तो देखील संरक्षित नाही, त्यालाही औषधोपचार वेळेत होणार नाही. यासाठी मी भाजपाच्या महापालिकेतील गटाचं अभिनंदन करेन, आमचे सर्व सदस्य नायर रूग्णालयात पोहचले आणि चौकशी केली. त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या धक्कादायक आहेत. ७२ तास झाले तरी महापौर तिथे पोहचल्या नव्हत्या, स्थायी समिती अध्यक्ष पोहचले नाहीत. सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष देखील पोहचले नाहीत. युवराजांचे हॅलिकॉप्टर तर सध्या जमिनीवरच येत नाही’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’या सर्वांच्या निषेधार्थ आमच्या सर्व सदस्यांनी राजीनामा देत काल मनपा सभागृहात प्रश्न उपस्थित केले. काय चुकलं? जर साडेचार हजार कोटी आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प असेल एक वर्षाचा, २२ हजार ५०० कोटी रुपये एक टर्ममध्ये खर्च केला जातोय, हे कशावर खर्च होतात हे विचारायचं नाही का? प्रश्न विचारलं तर गैर काय? राणीच्या बागेच्या पेंग्विनवर दिवसाकाळी दीड लाख खर्च केले जात आहेत आणि एक बाळाला वाचवण्यासाठी तुम्ही वेळेवर पोहचू शकत नाहीत का? हा प्रश्न विचारला तर झोंबतो तुम्हाला.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!