🕒 1 min read
गोंदिया : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महाविकासआघाडी सरकारमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं. राष्ट्रवादीने चक्कं भाजपसोबत आघाडीचं संधान बांधल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फारच संतापलेले दिसत आहेत. ट्विट करून पटोले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक काँग्रेसने आणि पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपला खिंडार पाडले होते. भाजपमधल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने बंड करून काँग्रेसला यश मिळवून दिले.
ही बंडखोरी झाल्यामुळे भंडाऱ्यासोबतच गोंदिया येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान चरण वाघमारे यांना भाजपातून निलंबित करण्यात आले आहे. यासर्व घडामोडीनंतर नाना पटोले नाराज झाले आहेत.
मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!#Gondia #Bhandara #Congress #Election #ZillaParishadElections
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 11, 2022
गोंदियात भाजप-राष्ट्रवादी :
गोंदिया जिल्हा परिषदेत भंडारा जिल्हा परिषदेप्रमाणेच भाजपा व राष्ट्रवादी अशी विचित्र युती झाली आहे. ५३ सदस्यीय गोंदिया जि.प.मध्ये २६ सदस्य भाजपचे आहेत. भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज होती. काँग्रेसचे १३ व राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले होते.इतर सदस्यांमध्ये ४ सदस्य चावी संघटनेचे, तर २ सदस्य अपक्ष होते. येथे काँग्रेसला एकाकी पाडून भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
