🕒 1 min read
मुंबई : अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने सर्वत्र लोकप्रियता मिळवली. क्रिकेटच्या मैदानावरही अनेक दिग्गज खेळाडूंनी या चित्रपटातील शैली कॉपी करत सेलिब्रेशन केले. आयपीएलच्या चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा आणि ओबेद मॅकॉय हे देखील मैदानावर हे सेलिब्रेशन करताना दिसले. आता एका महिला क्रिकेटरनेही हे सेलिब्रेशन केले आहे. दुबईतील फेअरब्रेक इनव्हिटेशनल टूर्नामेंटमध्ये विकेट घेतल्यानंतर महिला क्रिकेटपटूने ‘पुष्पा’ स्टाईलने सेलिब्रेशन केले. तिचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेपाळची महिला क्रिकेटर सीता राणानं हे सेलिब्रेशन केले. ५ मे रोजी टोर्नेडो आणि सॅफायर महिला संघांमध्ये सामना झाला, ज्यामध्ये नेपाळच्या विकेट घेण्याचा आनंद साजरा केला. विकेट घेतल्यानंतर राणाने अल्लू अर्जुनच्या शैलीचे अनुकरण केले आणि हनुवटीच्या खाली हात फिरवत मैदानावर धाव घेतली.
Hello, world ????????
We know you can't get enough of Nepal ???????? allrounder Sita Rana Magar's #Pushpa celebration at the SDG #FBI22????@SDGimpactfund | @gencorpacific | @CricketHK | @Sita_magar8 | @NepalCricket | #CricketTwitter pic.twitter.com/zg9dmS17wR
— Fairbreak (@fairbreakglobal) May 6, 2022
“It’s gone so far on social media."
Nepal’s Sita Rana Magar with the most popular celebration currently ????
????️ @fairbreakglobal pic.twitter.com/wlTRf0KeFt
— ICC (@ICC) May 10, 2022
फेअरब्रेक इनव्हिटेशनल टूर्नामेंट ही एक महिला क्रिकेट स्पर्धा आहे ज्यामध्ये अनेक देशांतील नवोदित क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत अनेक अनुभवी महिला क्रिकेटपटूंचाही सहभाग आहे, ज्यासाठी इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट, वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलर आणि पाकिस्तानची सना मीर यांनीही चांगल्या निधीची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
