🕒 1 min read
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत दिवसेंदिवस आरोप करताना पाहायला मिळत आहेत. किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत हा वाद चांगलाच पेटला आहे. किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले आहेत असा आरोप करत संजय राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तसेच भ्रष्टाचार कोण करतंय? यावरही माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी खुलासा केला.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात ट्विट्सची मालिका सुरू केली आहे. यात आज संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर सलग तिसऱ्यांदा आरोप केला आहे. भ्रष्टाचारी विरोधात लढण्याची सूत्र, भ्रष्टाचारी लोकांच्या हातातच, असा घणाघातच किरीट सोमय्यांवर यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
