Share

अजित पवारांनी केली राज ठाकरेंची मिमिक्री; पहा भन्नाट व्हिडीओ

Published On: 

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीयवादावरून बरीच टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. नेहमी इतरांची नक्कल करणाऱ्या राज ठाकरे यांची नक्कल यावेळी अजित पवार यांनी केली आहे.

“राज ठाकरे कधी दुपारी भर उन्हात सभा घेत नाहीत. सूर्य मावळला, संध्याकाळ झाल्यानंतर वातावरण चांगले झाले की मग हे सभा घेतात. मग ते नॅपकिनने तोंड पुसत असतात. ( यावेळी अजित पवार यांनी नॅपकीन मागवला आणि राज ठाकरे यांची तोंड पुसण्याची नक्कल केली) ते काय पुसत असतात काय माहीत. काय शिंकरायचे आहे ते एकदाच शिंकरून घ्या ना”, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांची नक्कल करत खिल्ली उडवली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे यांच्या भाषणात नवीन मुद्दा काहीच नाही. त्यांनी नेहमीचीच तीच ती कॅसेट लावली आहे. काय तर शरद पवार जातीयवादी आहेत. नाशिककरांना माहीत आहे पवार जातीयवादी आहेत का. शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांची ५० वर्षांची कारकिर्द तुमच्यासमोर आहेच. एखादी व्यक्ती तर धादांत खोटे बोलत असेल तर तिच्या बोलण्याला किती महत्व द्यायचे?”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!