Share

पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीमध्ये आघाडीसाठी बिघाडी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन महाराष्ट्र राज्यातील मोठ्या आणि बऱ्यापैकी श्रीमंत असणाऱ्या महानगरपालिका गेले कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या  हातात होत्या. पुणे महानगरपालिका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा बालेकिल्ला होय. परंतु, २०१७ फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी पक्षाच्या हातातून पुणे महानगरपालिकेची सत्ता खेचून घेतली.

येत्या काही दिवसातच राज्य निवडणूक आयोग पुणे- मुंबई सह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. पुणे महानगरपालिकेने १ फेब्रुवारी रोजी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. महाराष्ट्र राज्यात जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षाची छाप नेहमीच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर पडत असते. यावेळी पण असच घडलं आहे.  नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची छाप पडली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला सोयीची प्रभाग रचना करून घेतली आहे आसा आरोप पुणे शहरात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मनसे कडून केला जात आहे. १ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२२ नागरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास दाखवला आहे. प्रशांत जगताप यांच्या या विधानावर पुणे शहर काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन प्रारूप प्रभाग रचनेमुळे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकरता अनुकूल वातावरण तयार झाले असले तरी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि इतर पक्षातील विद्यमान नगरसेवक व बडे नेते आपल्या पक्षाकडे वळवल्याशिवाय पुण्यात आपली सत्ता येणार नाही हे राष्ट्रवादी पक्षाला पण ठाऊक आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांशी आघाडी करायची कि नाही ही चर्चा सध्या पुण्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वर्तुळात सुरु आहे.

      महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!