मुंबई: वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनेभारताविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या सामन्यापूर्वी किरॉन पोलार्डचा ‘मिसिंग’ लिहलेला फोटो शेअर केला आहे. दुसऱ्या सामन्यात पोलार्ड खेळला नव्हता. त्यामुळे तिसर्या एकदिवसीय सामन्यात तो खेळणार का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. याच पार्शवभूमीवर ब्राव्होने पोलार्डवर निशाणा साधत इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
दुस-या एकदिवसीय सामन्याआधी डीजे ब्राव्होने सोशल मीडियावर त्याच्या माजी वेस्ट इंडिज सहकाऱ्याची खिल्ली उडवणारी पोस्ट केली आहे. ब्राव्होने पोलार्डचा मिसिंग म्हणून फोटो शेअर केला आहे. आणि त्याखाली ” वय : ३४उंची:१.८५ मी, शेवटचे पाहिलेले चहलच्या खिशात, सापडल्यास कृपया वेस्ट इंडीजशी संपर्क साधा,” असे त्यांनी याखाली लिहले आहे. युझवेंद्र चहलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पोलार्डला पाहलियाच बॉलवर क्लीन बोल्ड केले होते. तसेच फिटनेसच्या चिंतेमुळे पोलार्डला दुसऱ्या वनडेतूनही बाहेर व्हावे लागले.
https://www.instagram.com/p/CZzpMxShzGH/?utm_source=ig_web_copy_link
शुक्रवारी वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. भारताने आधीच दोन सामने जिंकत मालिका २-० ने आपल्या नावे केली आहे. विंडीजला क्लीन स्वीप करत मालिका जिंकण्याचे प्रयत्न भारतीय संघ करताना दिसेल. तर दोन सामने गंवल्यानंतर निदान शेवटच्या सामन्यात तरी विंडीज किरॉन पोलार्ड खेळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.
महत्वाच्या बातम्या
- आश्चर्यम! छातीत दुखत असल्याचे सांगून हॉस्पिटल न जाता नितेश राणे थेट मोदींच्या सभेत
- “त्यांनी माझ्या वाट्याचे श्रेय घेतले”; अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा
- लतादीदींच्या स्मारकावरील वादावर मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- “मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा,पण…”; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटवा; शिवसेना आमदारांची मागणी


