🕒 1 min read
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी प्रभाग रचना आणि मतदार याद्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली आहेत. गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवणारी शिवसेना आणि इतर सर्वच पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करून तयार आहेत. शिवसेना नेहमीच तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल अशी घोषणा दर वेळी तयार करते.
आता २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने ‘पुढे चला मुंबई’ अशी घोषणा केल्याची माहिती मिळते. शिवसेनेकडून तशी कोणतीच अधिकृत घोषणा केली नसून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागील अनेक ट्विट मध्ये ‘पुढे चला मुंबई’ अशी टॅगलाईन वापरत आहेत. शिवसेनेच्या घोषणा ह्या नेहमीच राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपसोबत बिघाडी नंतर आता मुंबई निवडणुकीत शिवसेनाला कडवे आव्हान भाजप देणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील विकासकामांची पाहणी केली. यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. तर अजित पवार त्यांच्या बाजूला बसले होते. आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन अजित पवार सकाळीच मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. सकाळी सात वाजल्यापासून या पहाणी दौऱ्याला सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांना या दौऱ्याची माहिती नव्हती. अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना दिसले.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही- अजित पवार
- “आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- IPL 2022: पंड्या बंधू पुन्हा एकाच संघात खेळणार; कृणाल पंड्याचा ऑक्शनपूर्वी इशारा
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
