🕒 1 min read
पुणे: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Criticism of Rupali Patil) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी kirit सोमय्या पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यावरून बरेच आरोप- प्रत्यारोप झाले होते. आता आज पुन्हा किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) पुणे दौर्यावर जाणार आहेत. यावरूनच रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“पुण्यात कोण पायरी सोडतय, स्मार्ट सिटी आणि विकासातुन पुणेकरांचा सन्मान व्हायला हवा होता. पण कधी जीभ तर कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप सत्कार करत आहे. पुणेकरांची काय थट्टा लावलीये? मात्र पुणेकर तुमचा माज उतरवणार”, असा इशारा देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
पुण्यात कोण पायरी सोडतय …
स्मार्ट सिटी आणि विकासातुन पुणेकरांचा सन्मान व्हायला हवा होता ..
पण कधी जीभ तर कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप
सत्कार करतय ….पुणेकरांची काय थट्टा लावलीय !
पुणेकर तुमचा माज उतरवणार …— Rupali patil thombare (@Rupalispeak) February 11, 2022
एवढेच नाही तर ‘आज पुन्हा पुणे पालिकेत, लबाड लांडगा ढोंग करतंय ,आणा रे पायरी आणि कर सत्कार त्याचा एवढेच राहिले होते, तेही पूर्ण. लावा रे तो पायरीवरून घसरलेला व्हिडीओ. होऊन जाऊद्या खरे-खोटे कारण आता ड्रामा उघडा पडलाय ’,असेही रुपाली पाटलांनी म्हटले आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आजच्या पुणे दौऱ्यासंदर्भात माहिती दिली असून सकाळी ९.४० वाजता ते पुणे दौऱ्यासाठी दिल्लीमधून निघतील. ११ वाजून ३० मिनीटांनी ते पुण्यात पोहचणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “सोमय्यांवरील हल्ला महागात पडेल”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- “राष्ट्रवादी पक्ष आहे की मुस्लीम लीग?”, भातखळकरांचा शरद पवारांना सवाल
- IPL 2022: कोच नेहराच्या बोलण्यावर गुजरात टायटन्स ‘या’ तीन खेळाडूंना विकत घेणार!?
- “सोनिया गांधींच्या निवासस्थानाचे भाडे वर्षोनुवर्षे थकीत राहणे त्यांच्या लुटारू मानसिकतेचे प्रतीक”
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय’, रुपाली पाटलांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
