मुंबई: कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब प्रकरणाला लागलेले हिंसक वळण अतिशय दुर्दैवी आहे. कोणत्याही देशात, राज्यात, शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित राखण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहीजे, असेही ते म्हणाले.
दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा, असे अजित पवार म्हणाले. अशावेळी एखादी व्हिडीओ क्लिप व्हायरल केली जाते, मग त्यावरुन कुणीतरी ट्विट करतं, त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहीजे, असे आवाहन यावेळी पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हिजाब बंदीवर जितेंद्र आव्हाडांचे भाजपला निशाणा करत खोचक ट्विट; वाचा सविस्तर
- महाराष्ट्रात टोळीचे सरकार – चंद्रकात पाटील
- मुस्लिम भगिनींनी माझे कौतुक केल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका
- “महाराष्ट्राच्या बदनामीच काय…”; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
- नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

