Share

कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू असलेल्या हिजाब बंदी खटल्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एक आदेश जारी केला होता. आदेशात न्यायालयाने खटल्याचा पूढील निकल येईपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा आदेश देत शाळेत आणि महाविद्यालयात धार्मिक पोशाख घळण्यावर बंदी घातली होती. याप्रकरणी ह्या निकालाला विरोध करत काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात या निकलाल आव्हान केले होती. परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत कर्नाटक न्यायालयात सुरू असलेल्या याचिकरील निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ही सुनावणी कर्नाटक हायकोर्टात सुरू असून आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. कर्नाटकात काय होत आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष आहे. तसेच हे प्रकरण धार्मिक किंवा राजकीय न होऊ देण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाला दिले आहेत.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास राव यांनीही याचिका दाखल केली होती. याआधी गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!