Share

पुणे : मोक्कानुसार कारवाई केलेल्या दीप्ती काळेचा ससूनच्या ८ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Published On: 

पुणे — पुण्यातील नामवंत सराफाच्या आत्महत्या प्रकरणातील मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महिला आरोपी दीप्ती काळे हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळेच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का)  कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, यापूर्वी देखील दीप्ती काळेवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. तसेच तिला अटकही करण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीप्ती काळे हिची कोविड चाचणी करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असलेल्या ससून रुग्णालयातील बाथरूमच्या खिडकीतून तिने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन पडल्याने दीप्ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ती पडली व त्यात तिचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, दीप्ती काळे हिने आत्महत्या केली की ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडली याची माहिती मिळू शकलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!