Share

नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत

Published On: 

नाशिक : आठवडाभरापूर्वी जुने नाशिक भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी गळतीमुळे तब्बल २४ कोरोनाबाधितांच मृत्यू झाल्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयाने मृत व्यक्तींच्या वारसांना दोन लाख रुपये तर गंभीर आजारी झालेल्या रुग्णांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी महापालिकेकडून मृत रुग्ण तसेच गंभीर असलेल्या रुग्णांची यादी मागवली आहे.

गेल्या बुधवारी डॉ. हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागून २४ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर केली. तसेच नाशिक पालिकेने देखील पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

आता पंतप्रधान कार्यालयाने मृत रुग्णांच्या वारसांना दोन लाख रुपयांची तर गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी नाशिक महापालिकेला पत्र पाठवून या दुर्घटनेत मृत झालेल्या रुग्णांची तसेच गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांची यादी पाठवण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!