बुलढाणा – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यातच कुठे ऑक्सिजनची कमतरता तर कुठे इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना रुग्णांना संजीवनी ठरलेले रेमिडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय.
दरम्यान, याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरत असताना आता सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा चांगलेच संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे.एकीकडे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शन साठी वणवण फिरत असताना त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मात्र एजंटांकडे इंजेक्शन उपलब्ध आहेत. बाहेरून इंजेक्शन कसे मिळतात हे मला हे दाखवा मी माझ्या घरातून एक कोटी रुपये द्यायला तयार आहे. मी इंजेक्शन घेतो व रुग्णांना मोफत वाटतो. रुग्णांचे जीव तरी वाचतील, अशी संतप्त प्रतिक्रिया देत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान,कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा पूर्ण हादरला आहे. एकीकडे रुग्ण तर दुसरीकडे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा अशा बिकट परिस्थिती सध्या या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना रेमेडेसिवीरची गरज आहे मात्र अजूनही रेमेडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकत नसल्याने सर्वचजण हतबल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला
- बीडमधील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा, पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

