Share

‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’

Published On: 

मुंबई : कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. गेल्या चोवीस तासात भारतात 3 हजार 293 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकाच दिवशी 3 हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3,60,960 नवे रुग्ण सापडले आहेत. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.

हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अंहकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे. आपल्याच जनतेचे मृत्यू होत आहेत. अशा घटनांमुळे कोणतेही सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी टीका रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून लोकांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकमेकांना मदत करताना सामान्य लोक दिसत आहेत. यातून कोणाचं मन जिंकण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची गरज नसल्याचं दिसून येतं. मदतीचा हात असाच देत राहा आणि या आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवत राहा, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!