Share

कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

नागपूर : मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात यावे, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले असून त्यात मुंबईसह राज्यातील मृत्यूसंख्या दडवली जात असल्याचा आरोप केला आहे. मुंबईची मृत्यू संख्यासुद्धा सातत्याने दडवण्याचे काम होते आहे. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार आणि रोजची मृत्युसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांतसुद्धा आहे. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदवण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात ७ दिवसांत ४ हजार ४६० मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

नागपूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येत या कालावधीतील ही सरासरी २६,७९२ चाचण्या प्रतिदिन अशी असून ६८ लाखांच्या पुण्यात २२ हजार चाचण्या प्रतिदिन इतकी आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल असेही फडणवीस पत्रात म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!