Share

Nora Fatehi | नोराने केला जॅकलीनवर मानहानीचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

Nora Fateh | मुंबई: अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. जॅकलीन सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘सर्कस’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर जॅकलीन सध्या सुकेश प्रकरणांमध्ये अडकली असताना तिच्यासमोर आणखी एक आवाहन निर्माण झाले आहे. आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसवर केस दाखल केली आहे. या घटनेमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोरा आणि जॅकलीन दोघेही सुकेश प्रकरणांमध्ये अडकलेल्या आहेत.

नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नोराने जॅकलीनवर 200 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. जॅकलीनसह नोराने 15 माध्यम संस्थांच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. “माझ्याबद्दल अपमानास्पद सोबत बोलले गेले आहे”, असे तिचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ती म्हणाली आहे की, सुकेश प्रकरणांमध्ये मी जबरदस्तीने ओढलं गेलं आहे.

नोराने तिच्या वकीलामार्फत याचिका दाखल केली आहे. यामध्ये ती म्हणाली आहे की,”जॅकलीनने माझे सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान करण्यासाठी कट रचला होता. सुकेशशी माझा थेट संपर्क नव्हता. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामार्फत मी सुकेशला ओळखत होते. त्याचबरोबर सुकेशने मला दिलेल्या भेटवस्तू मी नाकारल्या होत्या.”

सुकेश प्रकरणामध्ये तिचे नाव खेचून तिची प्रतिमा खराब केली आहे, असं देखील ती म्हणाली आहे. सुकेश प्रकरणाबाबत नोरा आणि जॅकलीन या दोघींची चौकशी करण्यात आली होती. तर नोराच्या जवळच्या नातेवाईकाला सुकेशने 65 लाखांची गाडी भेट दिली होती असा तिच्यावर आरोप करण्यात आला होता. मात्र, नोराने यावर नकार दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!