Share

Ranji Trophy | अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्माला स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी

Published On: 

🕒 1 min read

Ranji Trophy | टीम महाराष्ट्र देशा: देशातील मुख्य देशांतर्गत फर्स्ट क्लास क्रिकेट टूर्नामेंट रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) परत आली आहे. आजपासून म्हणजेच 13 डिसेंबर 2022 पासून ही टूर्नामेंट सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 38 संघ सामील झालेले आहेत. कोरोना महामारीमुळे या स्पर्धेतील मागचा हंगाम बदललेल्या फॉरमॅटमध्ये खेळलेला होता. परंतु, यावर्षी रणजी ट्रॉफी परत आपल्या जुन्या फॉरमॅटमध्ये परतली आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना टीम इंडियातून वगळल्याची शक्यता वर्तवली जात असताना, त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये आपली योग्यता सिद्ध करायची शेवटची संधी आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये युवा खेळाडू टिळक वर्मा (Tilak Varma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashswi Jaiswal) यांना देखील स्वतःला सिद्ध करायचे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय भारतीय संघातील खेळाडू फलंदाज अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना भारतीय संघातून वगळू शकते. दरम्यान, या दोन्ही खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे.

अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी रणजी ट्रॉफीमध्ये जर उत्कृष्ट कामगिरी केली तर, 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएलच्या मिनी लिलावामध्ये या दोघांकडे सर्व संघाचे लक्ष वेधू शकते. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हा अजिंक्यकडे देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांचा विचार करायला वेळ नव्हता. मात्र, अजिंक्य रहाणेला आजपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःची छाप सोडावी लागणार आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे 27 जानेवारी पर्यंत ग्रुप स्टेज सामने खेळले जातील. तर, 25 ते 29 जानेवारी दरम्यान या स्पर्धेमध्ये प्ले गटाची अंतिम फेरी होणार. या स्पर्धेतील नॉकआउट सामने 31 जानेवारीपासून सुरू होतील. रणजी ट्रॉफी 2022-23 चा अंतिम सामना 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!