Share

Assembly Session 2022 | विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरूवातच वादळी झाली आहे. गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच आंदोलन आणि थेट शिंदे गटातील आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

 

काल मुंबईतील खड्डे, वाहतुक कोंडी या प्रश्नावर चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. ५० खोक्यांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात बिस्कीट घेत ‘फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आदी उपस्थित होते. यासर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे उरलेले दोन दिवस वादळी ठरण्याचे चित्र आहे. वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के, ‘बीएमसीचे खोके- मातोश्री ओके’, ‘लवासाचे खोके- बारामती ओके,’ अशा घोषणादेत सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!