मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षाचही पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. सत्ताधारी आणि विरोधक पक्षातील नेत्यांमधली टोलेबाजी खूप रंगू लागली आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात एक कविता म्हणली. त्यामधून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लक्ष्य केलं असल्याचं पाहायला मिळालं.
कितीही संकटं येऊ द्या, आपण सगळे एकत्र येऊया
कशाला करायचं राजकारण; आपला उद्देश समाजकारण
एकमेकांना साहाय्य करुया, महाराष्ट्राला पुढे नेऊया.
थांबवा आता शब्दांचे वार, आमचे मित्र अजित पवार
ही कविता म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून हल्ला केला आहे.
एवढंच नाहीतर सरकारकडून त्रुटी राहिल्या तर नजरेस आणून द्या. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठ्या चपाट्या आहेत, त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका, असं म्हणत पुढे ते असंही म्हणाले की, हा इशारा नसल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | “बलात्काऱ्यांना सोडून देणं, हाच महिलांचा सन्मान का?”; शरद पवार यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
- Sujit Patkar | संजय राऊत यांच्यानंतर त्यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यावर होणार कारवाई
- Bihar । सत्ताबदलानंतर लगेच बिहारमध्ये ED आणि CBI चे कामकाज सुरु; आरजेडीच्या आमदार आणि खासदारांच्या घरांवर छापेमारी
- Narayan Rane | महापालिका न्यायालयापेक्षा मोठी आहे का?; राणेंच्या बंगल्याबाबत महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल
- Eknath Khadse | एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला पर्दाफाश! रोहिणी खडसे हल्ला प्रकरणी सादर केला पेनड्राइव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

