मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत पोलीस भरतीचा प्रश्न उपस्थित केला. शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील विकसित झालेल्या शहरांमध्ये पोलिस विभाग असायला हवा तेवढा मोठा नसून शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे पोलिस भरती कधी करणार, असा प्रश्न अजित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
गुन्हेगारांवर मोक्का लावण्याचा निर्णय गृहविभाग घेईल का?-
नवी मुंबई संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली असता अजित पवार यांनी त्यात सरकारला उपप्रश्न केला. नवी मुंबई येथे अटक केलेले गुन्हेगार महिनाभरात जामिनावर सुटून पुन्हा आपली दहशत परसविण्यासाठी गुन्हे करत आहेत. या भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. ते झाल्यावर नवी मुंबई येथील परिस्थिती वेगळीच असेल. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर मोक्का लावण्याचा निर्णय गृहविभाग घेईल का? असे देखील अजित पवार यांनी विचारले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | थांबवा आता शब्दांचे वार, आमचे मित्र अजित पवार- एकनाथ शिंदे
- 50 खोक्यांवरुन सत्ताधारी – विरोधक यांच्यामध्ये धक्काबुक्की, अश्लील शिव्यांसह केला राडा
- Sharad Pawar | “बलात्काऱ्यांना सोडून देणं, हाच महिलांचा सन्मान का?”; शरद पवार यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
- Sujit Patkar | संजय राऊत यांच्यानंतर त्यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यावर होणार कारवाई
- Bihar । सत्ताबदलानंतर लगेच बिहारमध्ये ED आणि CBI चे कामकाज सुरु; आरजेडीच्या आमदार आणि खासदारांच्या घरांवर छापेमारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

