पुणे : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र काहींना मंत्रीपद न मिळाल्यामुळे अनेक नेते नाराज असले तरी आता यावरून रुपाली ठोंबरे यांनी राज्य सरकारवर तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
रुपाली ठोंबरे यांची पोस्टः
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेचा मोह नाही, मी सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचं नाव अमित शहा यांच्या आदेशामुळे जाहीर झालं तर पंकजा गोपीनाथ मुंडे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदावर चर्चा सुरू असतानाच स्वतः मुख्य उप मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र वंजारी व धनगर समाजाचा एकही मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न केला गेला, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
धनगर अन् वंजारी समाजाचा एकही आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री होऊ दिला नाहीः
मोदी साहेब ओबीसी आहेत सांगून ज्या समाजाच्या जीवावर भाजपने शंभर होऊन अधिक जागा जिंकल्या त्या ओबीसी समाजातील धनगर व वंजारी समाजाने गोपीनाथ मुंडे साहेब व बहुजन हृदय सम्राट महादेव जानकर यांच्याकडे पाहून भाजपला मतदान केलं होतं. ओबीसीतील मुख्य बाहुबली असणाऱ्या धनगर वंजारी समाजाचा एकही आमदार फडणवीस यांनी मंत्री होऊ दिला नाही कारण स्वतःला स्पर्धक नको होता, अशी जहरी टीका रूपाली ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर करत शिंदे गटावर देखील केली आहे.
दरम्यान, पन्नास आमदारांचा बंड करून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काही दिवसानंतर सत्ता बदल झाली आणि मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र यावेळी वंजारी अथवा धनगर समाजाच्या एकाही नेत्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे रूपाली ठोंबरे यांनी ही पोस्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ajit Pawar | पोलीस भरती कधी करणार? ; अजित पवार यांचा सरकारला प्रश्न
- Ajit Pawar | “आम्ही सत्तेत असताना विरोधकांना कधी अडवलं नाही, मात्र शिंदे गट…” ; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Amol Mitkari | “आमच्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या”; अमोल मिटकरी यांचा शिंदे गटावर आरोप
- Eknath Shinde | थांबवा आता शब्दांचे वार, आमचे मित्र अजित पवार- एकनाथ शिंदे
- 50 खोक्यांवरुन सत्ताधारी – विरोधक यांच्यामध्ये धक्काबुक्की, अश्लील शिव्यांसह केला राडा


