Share

Amol Mitkari | “आमच्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या”; अमोल मिटकरी यांचा शिंदे गटावर आरोप

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजीरवाना प्रकार घडला आहे. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी खोक्यांचा नारा लावला होता. हा नारा मागे देखील लावण्यात आला होता. मात्र यावेळी ’50 खोके एकदम ओके’ हा नारा सत्ताधारी मंडळींना जास्तच झोंबला असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते आमने सामने आले. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर आरोप केला आहे.

शिंदे गटातील आमदारने आम्हाला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर केला आहे. झालेल्या धक्काबुक्कीनंतर अमोर मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

शिंदे गटातील शिंदे नावाच्या आमदाराने धक्का-बुक्की केली-

काल महाविकास आघाडीची बैठकी झाली. त्यामध्ये चर्चा झाली की शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाच आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी करायची. म्हणून आम्ही साडेदहाला विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमायचं ठरवलं होतं. मात्र सत्ताधारी आमच्या आधी तिथे पोचले आणि आंदोलन करायला सुरुवात केली. आम्ही आंदोलन शांततेत करत होतो. मात्र शिंदे गटातील शिंदे नावाच्या आमदाराने धक्का-बुक्की करायला सुरूवात केली असल्याचं मिटकरींनी सांगितलं.

तसेच, आम्ही संस्कृती जपणारी, पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत. या घटनेनंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवीगाळ कऱणाऱ्यांना समज द्या. आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही जाब विचारणारच, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!