Share

Ajit Pawar | “आम्ही सत्तेत असताना विरोधकांना कधी अडवलं नाही, मात्र शिंदे गट…” ; अजित पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : विधान भवना बाहेर आज महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजवण्यासारखा प्रकार घडला आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर 50 खोके एकदम ओकेचा नारा सलग लावल्यानंतर सत्ताधारक आक्रमक झाले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली असून आई बहिणी वरून शिव्या देखील देण्यात आल्या. या संपूर्ण प्रकाराबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रीयाः

यादरम्यान, आम्ही सत्तेत असताना विरोधकांना कधी अडवलं नाही. मात्र शिंदे गटाच्या आमदारांना 50 खोके एकदम ओके, नारा इतका झोंबला की त्यांनी हा प्रकार केला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ज्याप्रकारे आम्ही घोषणा दाखवल्या त्यामुळे लोकांच्या मनात आपली प्रतिमा मलीन झाली का? अशी शंका त्यांनाच आली म्हणजे आपल्या मराठी भाषेत चोराच्या मनात चांदण्या म्हणातात असा हा प्रकार झाला असल्याचं पवार म्हणाले.

पाहा व्हिडीओः

यानंतर अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रीया दिली असून अजित पवारांनी हे वातावरण शांत केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाचा बंडः

एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसोबत बंड केला. यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एवढंच नाही तर त्यांनी शिवसेनेवर दावा देखील केला आहे. त्यामुळे संतप्त महाविकास आघाडी सराकारने बंडखोर आमदारांना 50 खोके एकदम ओके असं संबोधलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!