औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील मंजूर पदे भरण्याची कार्यवाही लवकरच होईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात देशमुख यांनी घाटीतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे सांगितले.
आमदार सतीश चव्हाण यांनी विधीमंडळ अधिवेशनात घाटीतील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. औरंगाबाद येथील घाटीत २३०० मंजूर जागांपैकी ५७५ रिक्त आहेत. तसेच औरंगाबादेतील अतिविशेषोपचार रुग्णालय येथील गट-अ ते गट-डची २१९, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील २२३ जागांना ८ जानेवारी २०२१ रोजी मान्यता देण्यात आली. हे खरे का? असा प्रश्न आमदार चव्हान यांनी उपस्थित केला. तसेच, औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात गट-अ ते गट-ड च्या ३६० जागांना ६ जानेवारी २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली का? या जागा भरण्यासाठी तसेच स्वतंत्र लेखाशीर्ष करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? असे उपप्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले होते.
आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, घाटीत ८६८ जागा रिक्त आहेत. अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष मंजुरीची बाब विचाराधीन आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या जागांबाबत देशमुख यांनी नेमके काय सांगितले, याचा तपशील लेखी उत्तरात उपलब्ध नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत रेकॉर्डब्रेक ५५० रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या
- ट्रकखाली चिरडलेल्या मजुरांना न्याय द्या; समृद्धी महामार्गावर कामगारांचे आंदोलन
- महसूल बुडाल्या प्रकरणी तहसीलदार सोनींवर कारवाई होणार; आ. दानवेंच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांचे उत्तर
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

