Share

“राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशीच…” ; अमित देशमुखांचे मोठे विधान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. राज्यात जशी युती आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, तसेच देशात देखील महाविकास आघाडी होऊ शकते, असे विधान अमित देशमुख यांनी केले आहे.

गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे, जशी राज्यात युती निर्माण झाली तसेच देशात देखील चित्र दिसण्याची शक्यता आहे. यामुळे आता चर्चेला उधान आले आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असे वक्तव्य देशमुख यांनी केले आहे. तसेच यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन देखील अमित देशमुख यांनी केले आहे.

संभाजी राजे विकास आघाडीसोबत येऊन काम करायला तयार –

आता येत्या काही दिवसात राज्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. त्यामुळे तयारी चांगली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संभाजीराजेंनी देखील उपोषण सोडले आहे. मागण्या मान्य केल्यामुळे संभाजी राजे हे विकास आघाडीसोबत येवून काम करायला तयार असल्याचे देखील अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!