Share

ट्रकखाली चिरडलेल्या मजुरांना न्याय द्या; समृद्धी महामार्गावर कामगारांचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

जालना : समृद्धी महामार्गावर ट्रकखाली चिरडून ठार झालेल्या दोन कामगारांना न्याय द्या आणि ट्र्कचालकाला अटक करा या मागण्यांसठी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. समृद्धी महामार्गावर सध्या काम करीत असलेल्या कामगारांनी केळीगव्हाण शिवारात हे आंदोलन केले. या वेळी त्यांनी कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत मृत मजुरांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रविवारी समृद्धी महामार्गालगत कामगारांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भरधाव हायवा घुसला होता. यात शेडमध्ये झोपलेल्या दोन कामगारांचा चिरडून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले होती. निधोन्याजवळील आंबेडकरवाडी परिसरात रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. यामध्ये मुकेश गोरेलाल भूमिया (२४), धनीलाल छकू भूमिया (२६, दोघे रा. करेला, जि.बरेला कठणी, मध्य प्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर संबंधित डंपरचालकावर चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. परंतु जोपर्यंत मृत कामगारांना न्याय मिळत नाही आणि चालकाला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत काम न करण्याचा निर्णय आता या कंपनीतील मजुरांनी घेतला होता. या मजुरांनी मंगळवारी केळीगव्हाण शिवारात समृद्धी महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी मृत कामगारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!