मुंबई : संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करता मुंबईतील प्रसिद्ध आझाद मैदानात २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरवात केली होती. आज महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी संभाजीराजे छत्रपती यांची आज ऐतिहासिक आझाद मैदानावर भेट घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे वाचन त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर केले. संभाजी छत्रपती यांच्या काही मागण्या मान्य झाल्याने ; त्यांनी दिनांक २६ फेब्रुवारी शनिवार रोजी सुरु झालेले आमरण उपोषण आज मागे घेतले.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. मला जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत मी मराठा समाजाच्या भल्यासाठी सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेणार नाही असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी मान्य केलेल्या मागण्या वाचून दाखवल्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण आज मागे घेतले. काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी होत्या त्यामुळे सर्व बाबींचा विचारकरून आम्ही काही मागण्या मान्य केल्या आहेत असं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच संभाजीराजे यांची महारष्ट्राला गरज आहे त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असे देखील आज एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जे निर्णय झाले ते पुढील प्रमाणे आहेत.
मराठा समाजाच्या विकासासाठी जी ‘’सारथी’’ संस्था सुरु करण्यात आली होती त्यात कौशल्य विकासाचे कार्यक्रम रचनेची सुरुवात १ महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. ३० जून २०२० पर्यंत सारथीसाठी VISION DOCUMENT तयार करणार आहोत. १५ मार्च २०२२ पर्यंत सारथी संस्थेतील उर्वरित जागा भरण्यात येणार आहेत. तसेच १५ मार्च पर्यंतच सारथी संस्थेसाठी जमीन अधिग्रहणाचे काम पण पूर्ण होणार आहे. सारथी संस्थेला अजून अतिरिक्त १०० कोटींची रक्कम महाराष्ट्र सरकार मार्फत देण्यात येणार आहे. मराठा समजातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे ; त्याला क्रेडिट गॅरंटी दिली जाणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोफत वसतिगृह सुरु करण्यात येणार असून त्याचे उदघाटन २०२२ मधील ‘गुडीपाडव्याला’ होणार आहे. तसेच ‘कोपर्डी’ गुन्ह्यात बळी पडलेल्या बालिकेला न्याय मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जोरकस मागणी करणार आहोत. तसेच मराठा आरक्षण मिळावे यासाठी ज्या ज्या युवकांनी आंदोलन केले होते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते ; त्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मराठा आंदोलनात हुतात्मा झालेल्या युवकांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी मिळणार आहे. ९/९/२०२० च्या आधी जे जे मराठा युवक सरकारी नोकरीमध्ये सामील झाले होते ; परंतु ज्यांची नोकरी आरक्षण रद्द झाल्यामुळे गेली त्यांना महाराष्ट्र सरकारमधील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. या सर्व मागण्या मान्य झाल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी आज आपले आमरण उपोषण मागे घेतले आणि पाठिंब्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या :
- VIDEO: ‘…अन्यथा राज्यपालांचे धोतर फेडणार’; विनोद पाटलांचा इशारा
- आणि अजित पवारांनी केले नरेंद्र मोदी यांचे कौतुक; म्हणाले…
- भारतीय संघाचे आरामात मालिकाविजय मात्र सुनील गावस्करांना सतावतेय ‘या’ गोष्टीबाबत चिंता
- भाजपच्या आमदाराला वादग्रस्त वक्तव्य भोवल ; निवडणूक आयोगाची कडक कारवाई
- “आणि तो आफ्रिकेसाठी खेळतानाही ५० हजार प्रेक्षक एबीडीचे नाव ओरडत होते”; विराट कोहलीने सांगितले चाहत्यांचे प्रेम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

