🕒 1 min read
औरंगाबाद : आमदार आंबादास दानवे यानी विधीमंडळ अधिवेशनात तीन कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देताना औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन तहसीलदार सतीश सोनी यांच्यावर महिन्याभरात कारवाई होईल, असे मंगळवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी विधिमंडळ अधिवेशनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रश्न उपस्थित करत, कूळ जमीन विक्री व्यवहारास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्याते निदर्शनास आणून दिले होते. खरेदीदारांकडून जमिनीच्या रेडीरेकनर दरानुसार निम्मी रक्कम वसूल केली नसल्यामुळे तीन कोटींचा महसूल बुडाल्याचे डिसेंबर २०२० मध्ये निदर्शनास आले आहे का? त्यावर कोणती कारवाई होत आहे, असे प्रश्न आमदार दानवे यांनी उपस्थित केले होते.
दानवेंच्या प्रश्नाला उत्तरप देताना महसुलम मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल बुडाला असल्याचे स्पष्ट केले. तसेच, याप्रकरणी तहसीलदार सोनी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील कलम ८ नुसार विभागीय चौकशी सुरू होत असल्याचे सांगतिले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे, कागदपत्रांसह दोषारोप जोडपत्र क्रमांक एक ते चार विभागीय आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती यावेळी थोरात यांनी दिली. दरम्यान, दानवेंच्या याच प्रश्नावरील चर्चेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोषींवर महिनाभरात कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत रेकॉर्डब्रेक ५५० रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या
- ट्रकखाली चिरडलेल्या मजुरांना न्याय द्या; समृद्धी महामार्गावर कामगारांचे आंदोलन
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!


