नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काही प्रमाणात दिलासा दिला. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये, तर डिझेलवरील शुल्कात 10 रुपये कपात केली असून, ती आज गुरुवारपासून लागू होईल. यावरुन काँग्रेसच्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारची खिल्ली उडवली आहे.
केंद्र सरकारने हा भीतीने घेतलेला निर्णय आहे, मनापासून नाही. वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर मिळेल, असं प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केंद्राच्या निर्णयामुळे सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
ये दिल से नहीं डर से निकला फैसला है।
वसूली सरकार की लूट को आने वाले चुनाव में जवाब देना है।#PetrolDieselPrice
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 4, 2021
गेल्या काही महिन्यांपासून इंधनदरात झपाट्याने वाढ होत असून, मुंबईत पेट्रोल 115.85 रुपयांवर पोहोचले. दिल्लीतही पेट्रोलदराने 110 रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- ‘राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?’
- दिवळीच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
- ‘दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले’
- नव्या बीड बायपास रोडचे उद्घाटन होणार नितीन गडकरींच्या हस्ते; नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार काम!


