🕒 1 min read
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत गोवा आणि महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या दरात तुलना करत राज्यसरकारवर टीका केली आहे.
चित्रा वाघ म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिवाळी भेट दिली आहे. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची उत्पादन शुल्क कमी केले आहे. गोवा, आसाम सरकार पेट्रोल डिझेल वॅट ७-७ रुपयांनी कमी केला आहे. यामुळे या राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी झाले आहेत. आता महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलचे वॅट कमी करुन आपली जिम्मेदारी पूर्ण करायला पाहिजे. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
#PM @narendramodi जी ने देशवासियों को दिवाली गिफ्ट दे दिया।
पेट्रोल पर 5 रु.और डीजल पर 10 रु.एक्साइज ड्यूटी कम किया है।
गोवा,असम सरकारने पेट्रोल-डीजल वैट में 7-7 रु. की कटौती की, इससे पेट्रोल डिजल सस्ता हुआ है!
अब #MVA सरकार भी अपनी जिम्मेदारी निभाऐ, डीजल-पेट्रोल पर वैट कम करे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 4, 2021
मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपये उत्पादन शुल्क कर कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे देशाची राजधानी दिल्लीत नवे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ६.०७ रुपये आणि ११.७५ रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ आणि ९४.१४ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
- दिवळीच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
- ‘दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले’
- नव्या बीड बायपास रोडचे उद्घाटन होणार नितीन गडकरींच्या हस्ते; नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार काम!
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
