Share

‘राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात  10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारलाही पेट्रोल-डिझेलच्या दर कमी करण्यावर भाष्य केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 5 आणि डिझेल दरात 10 रुपयांची घसघशीत कपात केली आहे. पायाभूत सेवांचे शेकडो प्रकल्प, मोफत लसीकरण अशा अनेक सुविधा देऊनही केंद्र सरकार जर हे करू शकते तर राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!