नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे.
अखेर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले’
- नव्या बीड बायपास रोडचे उद्घाटन होणार नितीन गडकरींच्या हस्ते; नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार काम!
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

