🕒 1 min read
मुंबई : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपचा दारुन पराभव केला आहे. तर शिवसेनेने दिवाळीला सीमोल्लंघन करत दादरा नगर हवेलीत भगवा फडकविला. त्याचबरोबर भाजपच्या जीवावर शिवसेनेचे आमदार निवडून आल्याचं भाजपकडून बोललं जात होतं. याचं उत्तर शिवसेनेने दादरा नगर हवेलीत भगवा फडकवून दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुफान टोलेबाजी करत भाजपला डिवचलं आहे.
ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या भाजपच्या अहंकारालाही या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे तडा गेला आहे. 13 राज्यातील पोटनिवडणुकींचे निकाल सांगतात. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा नगर हवेलीत शिवसेनेने जोरदार विजय मिळवला. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान कलाबेन डेलकरांनी मिळवला आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपच्या अपयशावरुन भाजपला सुनावलं आहे.
गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता शिवसेना जिंकली, देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देशपातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, अशा शुभेच्छा आजच्या अग्रलेखातून देण्यात आलेल्या आहेत.
तेरा राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल त्यांनी दिवाळी साजरी करून नाचावे, असे लागलेले नाहीत. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नव्या बीड बायपास रोडचे उद्घाटन होणार नितीन गडकरींच्या हस्ते; नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार काम!
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!
- राज ‘का’ कारण! सहानुभूतीची लाट आणि एकजुटीमुळेच देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
