मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे. यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीत 5 आणि 10 रुपयांची कपात केली आता वेळ राज्यातील ठाकरे सरकारची आहे. राज्यात केंद्राप्रमाणे 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण त्याचबरोबर राज्य सरकार गेल्या 2 वर्षात जे 5 रुपये वाढवले तेही कमी व्हायला हवे, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
केंद्रातील @narendramodi सरकारने पेट्रोल डिजेल च्या किमतीत ५ व १० रुपयाची कपात केली आता वेळ राज्यातील @OfficeofUT सरकारची आहे. राज्यात केंद्राप्रमाणे ५ व १० रूपये कपात व्हायलाच हवी पण त्या बरोबर राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात जे ५ रूपये वाढवले तेही कमी व्हायला हवे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 4, 2021
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपाशासित अनेक राज्यांनी इंधन दरात कपात केली आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील व्हॅट 7 रुपये आणि डिझेलवर 2 रुपयांनी कमी करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही इंधनांच्या किमती येथे प्रतिलिटर 12-12 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?’
- दिवळीच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
- ‘दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले’
- नव्या बीड बायपास रोडचे उद्घाटन होणार नितीन गडकरींच्या हस्ते; नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार काम!
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’


