🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. नुकताच सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारही झाला. यात शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर याच बंडखोर आमदारांनी खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा वेळोवेळी केला आहे. शिंदेंनी शिवसेना या नावाबरोबरच पक्ष चिन्ह म्हणजेच धनुष्य बाणावरही हक्क सांगितला. यासंदर्भात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात न्यायालयीन लढाई सध्या सुरु आहे. तर यावरच शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देत न्यायालयात त्यांना न्याय मिळेल आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “पुढचे १० दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. 22 तारखेला कोर्टाचा निकाल येईल. तो आमच्याच बाजूने असेल. त्यामुळे त्यानंतर येणारी प्रत्येक रात्र शिंदे गटासाठी अंधाराची असेल. त्यामुळे या १० दिवसांमध्ये काय मनमानी करायची ती करून घ्या.” पुढे बोलताना त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरेंचे विचार स्पष्ट होते. ते म्हणायचे कोणासोबतही गद्दारी करायची नाही. मात्र तुम्ही थेट पाठीत खंजीर खूपसलाय. त्यामुळे आता गद्दारी आणि विश्वासघात हीच केसरकरांची आणि इतर 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे”, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाला कि, “चित्रा वाघ यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. संजय राठोडांविरोधात त्यांनी खूप संघर्ष केला होता. पण पक्षातील कोणीही त्यांचे ऐकले नाही. शेवटी राठोडांना मंत्रिपद दिलेच.”
पक्ष चिन्हाबाबतीत शहाजीबापूंचा दावा
“राज्यघटनेप्रमाणे ज्यांच्याकडे बहुमत असते त्या गटालाच पक्षचिन्ह मिळतं. त्यामुळे ते आम्हालाच मिळेल. कारण आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, खरी शिवसेना आमचीच आहे. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, असा विश्वास आम्हाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखे कष्टाळू मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. त्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. महाराष्ट्रातील लोक त्यांना आशीर्वाद देत आहे. त्यामुळेच या न्यायालयीन लढाईतील सर्व निकाल हे शिंदेंच्याच बाजूनी लागतील.”, असं मत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Rathod । बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी शिवसेनेत आलो, स्मृतीस्थळी वंदन केल्यानंतर संजय राठोडांची प्रतिक्रिया
- Shahajibapu patil | “बहुमत असल्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळेल”; शहाजीबापू पाटलांचा दावा
- Eknath Shinde | पंधरा ते वीस दिवसात वर्षावर रहायला येणार – एकनाथ शिंदे
- Shahajibapu patil | “राठोडांना मंत्रिपद देऊन शिंदेंनी न्यायच केला”; शहाजीबापूंनी केली सरकारची पाठराखण
- Nana Patole | विधान परिषदेत विरोधी पक्षनेते निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नाही – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

