Share

Shahajibapu patil | “बहुमत असल्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळेल”; शहाजीबापू पाटलांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. नुकताच सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारही झाला. मात्र याच बंडखोर आमदारांनी खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा वेळोवेळी केला आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना असा करत उद्धव ठाकरे समर्थकांचा उल्लेख उद्धव ठाकरे गट असा केला. शिंदेंनी शिवसेना या नावाबरोबरच पक्ष चिन्ह म्हणजेच धनुष्य बाणावरही हक्क सांगितला. यासंदर्भातील न्यायालयीन लढाई सध्या सुरु आहे. तर यावरच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खरी शिवसेना म्हणजे शिंदे गटचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्यघटनेप्रमाणे ज्यांच्याकडे बहुमत असते त्या गटालाच पक्षचिन्ह मिळतं. त्यामुळे ते आम्हालाच मिळेल. कारण आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, खरी शिवसेना आमचीच आहे. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, असा विश्वास आम्हाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखे कष्टाळू मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. त्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. महाराष्ट्रातील लोक त्यांना आशीर्वाद देत आहे. त्यामुळेच या न्यायालयीन लढाईतील सर्व निकाल हे शिंदेंच्याच बाजूनी लागतील.”, असं मत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

राठोडांना मंत्रिपद देणे योग्यच
संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याच्या निर्णयावर बोलताना शहाजीबापू म्हणाले. “हे राजकारण आहे. इथे अनेक नेत्यांवर अनेक वेळा विविध आरोप केले जातात. पण ते सगळे खरे असतात असं नाही. राठोडांवर जे आरोप झाले होते, त्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेऊन योग्यच केलं. हा निर्णय न्याय देणारा आहे. राजकीय नेत्यावर असलेल्या आरोपांमध्ये पोलिसांनी जर क्लिन चीट दिली असेल तर त्याचे राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!