🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच एकनाथ शिंदे हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी शिफ्ट होणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्याला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता, हो लवकरच वर्षा निवासस्थानी शिफ्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बंगल्यात काही डागडुजीचे काम सुरु असून, लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
वर्षा या निवासस्थानी राहण्यापूर्वी तिथे पूजा करणार असल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वर्षावर राहण्यास जाऊ, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाबाबतही विचारणा केली होती. त्यावर त्यांनी तूर्तास काहीही बोलण्यास नकार दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu patil | “राठोडांना मंत्रिपद देऊन शिंदेंनी न्यायच केला”; शहाजीबापूंनी केली सरकारची पाठराखण
- Nana Patole | विधान परिषदेत विरोधी पक्षनेते निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नाही – नाना पटोले
- Ambadas Danve । फुले शाहूंचा महाराष्ट्र हा आता गद्दारांचा महाराष्ट्र झालेला आहे; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
- Deepak Kesarkar । दीपक केसरकारांचा शरद पवारांना सल्ला, म्हणाले…
- Jalna । जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा, तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त


