Share

Shahajibapu patil | “राठोडांना मंत्रिपद देऊन शिंदेंनी न्यायच केला”; शहाजीबापूंनी केली सरकारची पाठराखण

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले संजय राठोड यांनाही या सरकारमध्ये मंत्रिपद दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयामुळे सर्वच राजकीय वर्तुळातून सरकारवर टीका होत आहे. या सगळ्यातही बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी मात्र सरकारची पाठराखण केली आहे.

संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याच्या निर्णयावर बोलताना शहाजीबापू म्हणाले. “हे राजकारण आहे. इथे अनेक नेत्यांवर अनेक वेळा विविध आरोप केले जातात. पण ते सगळे खरे असतात असं नाही. राठोडांवर जे आरोप झाले होते, त्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेऊन योग्यच केलं. हा निर्णय न्याय देणारा आहे. राजकीय नेत्यावर असलेल्या आरोपांमध्ये पोलिसांनी जर क्लिन चीट दिली असेल तर त्याचे राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

तसेच यावेळी त्यांनी बच्चू कडूंच्या नाराजीवर अधिक भाष्य करणं टाळलं. ते केवळ एवढच म्हणाले कि, “बच्चू कडू नाराज आहेत कि नाही या बाबत मला काही कल्पना नाही. मात्र मंत्रिमंडळात सर्वांना संधी मिळेल. मुख्यंमत्री जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील.”

राठोडांची प्रतिक्रिया
या सर्व टीकांच्या पार्श्वभूमीवर स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड म्हणाले, “मी मोठ्या मताने ४ वेळा विधानसभेवर निवडून आलो आहे. मला मंत्रिपदाची संधी मिळाली मागच्या सरकारमध्ये देखील मी मंत्री होतो. त्यावेळी एक घटना दुर्दैवी झाली त्यावरुन माझ्यावर आरोप झाले. ते आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी समजून आरोपाची निस्पक्ष चौकशीसाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मला या प्रकरणामध्ये क्लिन चीट दिली आहे. तसा अहवाल देखील पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. ते कागदपत्र बघून मला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाची संधी दिली.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!