पुणे : संत तुकाराम शिला मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत आले होते. यावेळी त्यांनी संत तुकाराम मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यासोबतच संत तुकाराम शिला मंदिराचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. दरम्यान, व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांनी भाषणे केले. मात्र अजित पवार यांनी भाषणाची संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी आहे.
अजित पवार यांना भाषणाची संधी नाही, ही बातमी कदाचीत नरेंद्र मोदी यांच्या देखील लक्षात आली असेल त्यामुळे व्यासपिठावरील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाची भाषणासाठी घोषणा झाल्यानंतर खुद्द मोदी यांनीही अजित पवार यांच्याकडे हात दाखवून भाषणासाठी विचारणा केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “श्री क्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी आज एक सामान्य वारकरी म्हणून इथे आले असतील तर “भेदाभेद भ्रम अमंगळ l” या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला. व हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला.”
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवून घेणार नाही”, असे मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

