मुंबई : अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर आता वादात सापडला आहे. सिद्धांत कपूर याच्यावर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीतुन सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण सिद्धांत कपूरला जामीन मिळाल्याची माहिती समोर येत आहे. कपूर कुटूंबातील फक्त सिद्धांत बदनाम झाला आहे असे नाही तर, याआधी श्रद्धा कपूर आणि वडील शक्ती कपूर देखील खूप चर्चेत आले होते.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात ड्रग्जचे प्रकरण समोर आले होते. यावेळी यामध्ये अनेक अभिनेत्रींची नावे आली होती आणि त्यामध्ये श्रद्धा कपूरचे देखील नाव आले होते. तपासात एनसीबीला चॅटमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव सापडले, त्यानंतर तिची बराच वेळ चौकशी करण्यात आली. मात्र, एनसीबीला श्रद्धाविरुद्ध कोणतेही पुरावे न सापडल्याने तिला क्लीन चिट देण्यात आली.
बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर #MeToo चा आरोप करण्यात आला होता . २००५ मध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शक्ती कपूर कामाच्या बदल्यात काही मागण्या करत असल्याचे समोर आले होते, त्यामुळे देखील ते खूप चर्चेत आले होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

