पुणे : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर (शिळा मंदिर) लोकार्पण सोहोळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “श्री क्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी आज एक सामान्य वारकरी म्हणून इथे आले असतील तर “भेदाभेद भ्रम अमंगळ l” या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला. व हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला.”
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही”, असे मिटकरी म्हणाले.
“तुकोबारायांचा ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाचे काठी हाणु माथा ll ‘ हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये, याची काळजी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी”, असा टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :


