Share

वीर सावरकरांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत काय म्हणाले? वाचा सविस्तर

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरातील शिला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हे मंदिर 17 व्या शतकातील संताला समर्पित आहे. मंदिराच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांशी संवादही साधला. देहूमध्ये 20 जूनपासून सुरू होणाऱ्या वार्षिक वारीची परंपरा लक्षात घेऊन हा दौरा होता.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्या धर्मग्रंथात मानव जन्मातील दुर्लभ संतांचा सत्संग असल्याचे सांगितले आहे. संतांची कृपा झाली तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज या पवित्र तीर्थक्षेत्र देहूवर येताना मलाही तेच वाटत आहे. देहूचे शिला मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्र नाही तर भारताचे सांस्कृतिक भविष्यही प्रस्तापीत करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो.”

“छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रीय नायकाच्या आयुष्यातही तुकारामजींसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली, वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली. तेव्हा तुरुंगात ते हातकड्यांची चिपळी बनवून तुकारामजींचे अभंग म्हणत असत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, “आपली राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. म्हणूनच, आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचे पर्याय बनत आहेत. तेव्हा विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे जातील याची आम्ही काळजी घेत आहोत.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!