मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियनने ९ जुन २०२० रोजी आत्महत्ता केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर या दोघांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजार राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आले होते. यानंतर राणे पिता पुत्राने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि आज राणे पिता पुत्राचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
https://youtu.be/MH24vUP9WZw
यासंदर्भात स्वतः नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे पण त्याचबरोबर काही अटी आणि शर्थी देखील ठेवल्या आहेत. तसेच राणे यांनी न्यायालयाचे आभार देखील मानले आहेत. “लोकशाहीमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना जे काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचं आम्ही पालन करतो. कोणा विरोधात अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करतो. ते अधिकार न्यायालयाने कायम ठेवले त्यासाठी न्यायालयाचे मी आभार मानतो” असे नितेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

