Share

“काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका

Published On: 

मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आता राजकीय वर्तुळातही चांगलाच गाजत आहे. यावरून भाजप-काँग्रेस वाद सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

दरम्यान राज्यात भाजपकडून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी भाजप नेते अतुल भातखळकर, नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता राज्यात या चित्रपटावरून राजकारण रंगताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!