Share

वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!

Published On: 

मुंबई: काल १५ मार्च रोजी विधिमंडळात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज पुढील तीन महिने तोडली जाणार नाही असेही सांगितले होते. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी गेली आहे, त्या शेतकऱ्यांची लवकर वीज जोडणी करावी असे निर्देशही देण्यात आले होते. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या पाश्वर्भूमीवर निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्हा पातळीवरच्या महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे.

जिल्हा पातळीवरच्या महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ असा आदेश दिला आहे . तसेचं या पत्रामध्ये रिकनेक्ट असाही आदेश देण्यात आहे. पुढच्या तीन महिन्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्याचं काम थांबवण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सभागृहात उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले –

“ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा सुरु केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचं राऊत यांनी सभागृहात सांगितलं. शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत असे राऊत म्हणाले”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!