मुंबई: सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि खळबळजनक दाव्यांमुळे हे अधिवेशन रंगलेले दिसत आहे. यातच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारमधील अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा विधिमंडळात माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे हे त्यांनी वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेमक्या कोणत्या मंत्रांबद्दल केले आहे, याची चर्चा सुरु झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पुढे बोलताना चंद्रकांत पाटील असेही म्हणाले, “मोदींनी सांगितलंय की ना खाऊंगा, ना खाने दूंगा. त्यामुळे काही सुपात आहेत आणि काही जात्यात आहेत. सुपात आहेत ते जात्यात जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”. त्यामुळे जसजशी नावं समोर येतील, तसतशा कारवाया होतील. सध्या एकाच वेळी अनेक कारवाया सुरू आहेत. १५०० कोटींची कामं आपल्या जावयाला दिली, न्यायालयानं ठोकलं आणि कामं रद्द करावी लागली असे एक मंत्री आहेत. परबांच्या रत्नागिरीतील रेसॉर्टप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्यानंच तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे किमान १० जणांना तरी नैतिकता असेल तर किंवा न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागेल, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

