Share

Praveen Kumar Death : महाभारतात ‘भिम’ साकारणारे प्रवीण कुमार काळाच्या पडद्याआड

Published On: 

नवी दिल्ली : मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीमाची भूमिका करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रवीण कुमार सोबती दीर्घकाळापासून आजारपणा आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी आपल्या मजबूत शरीराच्या जोरावर खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

खेळाडू म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर प्रवीण कुमार सोबती बॉलिवूडकडे वळले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या, पण बीआर चोप्राच्या ‘महाभारत’ने त्यांना सर्वाधिक ओळख दिली. ज्यात त्यांनी भीमाची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेने त्यांना घरोघरी प्रसिद्धी दिली. प्रवीण कुमार सोबती यांना त्यांच्या मजबूत शरीरामुळे भीमाच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली होती.

प्रवीण कुमार सोबती यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अमिताभ बच्चन, जितेंद्र यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. त्यांनी १९८१ मध्ये ‘रक्षा’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९८१ मध्येच  आलेल्या ‘मेरी आवाज सुनो’मध्ये प्रवीण कुमार सोबतीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटांमध्ये त्यांनी जितेंद्रसोबत काम केले. त्यानंतर ते अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ या सुपरहिट चित्रपटातही दिसले. याशिवाय चाचा चौधरी या मालिकेत ते साबूच्या भूमिकेत दिसले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!